Home > Uncategorized > सेना नगरसेवकांमध्ये सभागृहात धक्काबुकी

सेना नगरसेवकांमध्ये सभागृहात धक्काबुकी

सेना नगरसेवकांमध्ये सभागृहात धक्काबुकी
X

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सोमवारच्या सर्वसाधारण महासभेत दिपेश म्हात्रे यांनी माणकोली पुलासंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नाला सेनेचेच नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी हरकत घेतली.यावरून दोघामध्ये सभागृहात शाब्दिक चकमक होवून धक्काबुकी झाली. सभागृह नगरसेवकांमध्ये हाणामारीची बातमी बाहेर येताच या नगरसेवकांच्या समर्थक अंगरक्षक व बाऊंसर्स यांनी आपसात सभागृहाबाहेर जोरदार राडा करीत सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी येवून लाठीमार करीत दोघांच्याही बाउन्सर व समर्थकांची धरपकड केली आणि पोलिसांच्या गाडीत बसून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यापूर्वी अश्या घटना घडल्याने त्यावेळी तत्कालीन पालिका आयुक्तांनी नगरसेवकांच्या बाउन्सर व समर्थकांना महासभेच्या दिवशी पालिकेच्या आवारात बंदी घातली होती. मात्र तरही बंदी झुगारून बहुंताश नगरसेवकांचे बाउन्सर व समर्थक बिनधास्तपणे महासभेच्या बाहेरच्या दालनात येऊन बसतात.

Updated : 10 Sep 2018 4:09 PM GMT
Next Story
Share it
Top