मुंबई महापालिकेच्या कामांची श्वेतपत्रिका काढा - धनंजय मुंडे
X
घाटकोपरमध्ये दोन दिवसांपूर्वी इमारत कोसळली होती. या घटनेेचे पडसाद आज पावसाळी अधिवेशनात उमटत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय. मुंबई महापालिकेच्या कामांची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी त्यांनी यावेळी केलीय. श्वेतपत्रिका काढल्यास मुंबईचे खरे पहारेकरी आहेत ते सिद्ध होईल. १७ लोकांच्या मृत्यूनंतर तरी शिवसेना जागी होणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. मलिष्काच्या घरातील आळ्या शोधता तसे अनाधीकृत बांधकामं शोधा असं आव्हान त्यांनी शिवसेनेला दिलंय.
मुंबई महापालिकेत तेच तेच अधिकारी कित्येत वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यामुळे धोकादायक इमारत ठरवण्यात मोठा भ्रष्ट्राचार होत आहे. म्हणून बांधकाम विभागाबाबत आलेल्या तक्रारी आणि इतर बाबींवर श्वेतपत्रिका काढाण्यात यावी अशी मागणी मुंडे यांनी केली. शिवाय घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 10 लाख तर जखमींच्या वारसांना 3 लाखांची मदत करा अशी मागणीही त्यांनी केली.