Home > Uncategorized > भाजप आमदार आशिष देशमुखांची सरकार विरोधात घोषणाबाजी

भाजप आमदार आशिष देशमुखांची सरकार विरोधात घोषणाबाजी

भाजप आमदार आशिष देशमुखांची सरकार विरोधात घोषणाबाजी
X

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सात पानी तक्रारपत्र दिल्याने चर्चेत आलेले भाजप आमदार आशीष देशमुखांनी बोंडअळीच्या प्रश्नावरुन विरोधकांसह विधानसभा अध्यक्षा समोरील वेल मध्ये उतरुन घोषणाबाजी केल्याने भाजपची चांगलीच पंचाईत झाली. २९३ अन्वये सभागृहातील बोंडअळीमुळे झालेल्या चर्चेत त्यांच्या नावाचा समावेश नसल्याने आशिष देशमुख नाराज झाले होते. त्यामुळे बोंडअळी चर्चा सुरु होताच विरोधकांसह तेही अध्यक्षा समोरील हौदात उतरुन घोषणाबाजी करु लागेल. नंतर बाहेर माध्यमांशी खाजगीत बोलताना देशमुखांनी नाराजी व्यक्त केली. मात्र यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.

६ डिसेंबर रोजी देशमुखांनी मुख्यमंत्र्यांनी सात पानी पत्र लिहून तक्रारींचा पाढा वाचणारे विदर्भीय आमदार आशिष देशमुख हिवाळी अधिवेशनात गेले दोनही दिवस अनुपस्थित होते, त्यामुळे देशमुखांबाबत शंका व्यक्त होत होत्या. त्यामुळे आज देशमुख अधिवेशनाला आल्याने ते काय म्हणतायत याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. सत्ताधारी आमदार देशमुखांनीही प्रत्यक्ष स्वसरकारलाच भर सभागृहात घेरल्याने सत्ताधारी अडचणीत आले.

Updated : 13 Dec 2017 7:43 AM GMT
Next Story
Share it
Top