Home > Uncategorized > भाजपामध्ये निधी वाटपावरुन 'तू-तू, मैं-मैं'

भाजपामध्ये निधी वाटपावरुन 'तू-तू, मैं-मैं'

भाजपामध्ये निधी वाटपावरुन तू-तू, मैं-मैं
X

जळगाव महापालिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ कोटींचा विशेष निधी दिला. मात्र या २५ कोटींच्या निधी वाटपावरून भाजपमध्येच वाद रंगलाय. भाजपच्या वेगवेगळ्या गटातील नेते तसेच नगरसेवकांनी वादाला आणखीच फोडणी दिलीय. निधी वाटपात विश्वासात घेतलं गेल नाही, असा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केलाय. निधीचा योग्य वाटप झाले नाही तर महापलिकासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही भाजपच्या नगरसेवकांनी दिलाय.

मुख्यामंत्र्यांचे निकटवर्तीय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील माजी मंत्री एकनाथ खडसे, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्यात ही ह्याच निधी वाटपावरून अंतर्गत वाद सुरु आहे. भाजपाचे दिग्गज नेते असूनही निधी वाटपाचा वाद मिटत नसल्याने आर्श्चय होत आहे. या वादात मात्र जळगावकरांच नुकसान होत आहे.

Updated : 15 Dec 2017 2:36 PM GMT
Next Story
Share it
Top