Home > Uncategorized > परळ स्टेशनवर चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा २२ वर

परळ स्टेशनवर चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा २२ वर

परळ स्टेशनवर चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा २२ वर
X

मुंबईत परळ रेल्वे स्टेशन आणि एल्फिन्स्टन रोड स्टेशनदरम्यानच्या फूटओव्हरब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत २२ जण दगावले असून जवळपास २५ प्रवासी जखमी झाले आहेत. सकाळी १०.३०च्या सुमारास ही घटना घडली.

परळ आणि एल्फिन्स्टन स्टेशन हे दोन्ही स्टेशन अत्यंत गर्दीचे स्टेशन असून या ठिकाणांवरचे जिने अत्यंत अरूंद आहेत. लोअर परळ भागात अनेक ऑफिसेस असून या ऑफिसमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मध्ये रेल्वेवरचे परळ स्टेशन किंवा पश्चिम रेल्वेचे एल्फिन्स्टन रोड स्टेशन यावर उतरावे लागते. ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच सणाच्या खरेदीसाठी अनेक जण आलेले असल्यानं आज नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. एल्फिन्स्टनच्या रोड स्टेशनच्या पश्चिमेकडे इंडिया बुल्स सेंटरकडे जाणाऱ्या जिन्यावर प्रचंड गर्दी झाली होती. पाऊस सुरू असल्यानं अनेकांना बाहेर पडता येत नव्हतं. त्यातच काही तरुणांनी पूल कोसळत असल्याची अफवा पसरवल्याचं सांगितलं जातंय. त्यातूनच गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली.

या संपूर्ण प्रकरणाची रेल्वे आणि राज्य सरकार मिळून चौकशी करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना प्रत्येकी ५ लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्याचीही घोषणा केली आहे.

Updated : 29 Sep 2017 6:07 AM GMT
Next Story
Share it
Top