Home Election 2019 छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन मी उध्दव ठाकरे शपथ घेतो की….

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन मी उध्दव ठाकरे शपथ घेतो की….

Support MaxMaharashtra

निवडणूकीचा निकाल लागून तब्बल ३६ दिवसानंतर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला. उध्दव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राज्यातील लाखो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

हे ही वाचा
काय आहे महाविकास आघाडीचा ‘कॉंमन मिनिमम प्रोग्राम’?
आदर्श’घोटाळ्याची फाईल उघडली, अशोक चव्हाण मंत्री पदाला मुकणार?
दहशतवादी प्रज्ञा ने दहशतवादी गोडसेला देशभक्त बनवलं – राहुल गांधी

उध्दव ठाकरे यांनी शिवाजी महाराज यांना वंदन करुन, आई-वडीलांचं स्मरण करुन शपथ घेतली. यावेळी लाखोच्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. उध्दव ठाकरे यांच्या बरोबर राष्ट्रवादीतून जयंत पटेल, छगन भुजबळ काँग्रेसमधून नितीन राऊत, बाळासाहेब थोरात, शिवसेनेमधून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

या शपथविधीसाठी सोहळ्यासाठी राज्यातील ४० हजार शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997