Home News Update किरीट सोमय्या पुन्हा उध्दव ठाकरेंवर बरसले कोर्टात काय उत्तर देणार सरकार

किरीट सोमय्या पुन्हा उध्दव ठाकरेंवर बरसले कोर्टात काय उत्तर देणार सरकार

Support MaxMaharashtra

आरे मधील मेट्रो कारशेडला शिवसेनेने दिलेली स्थगिती बेकायदेशिर असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना भाजप असा थेट सामना पुन्हा रंगणार अशी चिन्हं आहेत. 29 नोंव्हेंबरला राज्य सरकारने मेट्रो रेल्वेला जे पत्र दिले आहे त्यात स्थगिती नमूद केली असल्याचा दावा सोमय्या करत आहेत. सुर्प्रिम कोर्टात राज्य सरकारने जी प्रतिज्ञापत्रं सादर केली आहेत त्यात आम्ही सर्व कायदेशिर कामे केली आहेत असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे आता स्थगिती का असा सवाल सुप्रिम कोर्टात उपस्थित होऊ शकतो असा किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे. या स्थगितीमुळे सुमारे 18 लाख कोटींच्या प्रकल्पावर प्रश्नंचिन्हं निर्माण झाल्याचं सोमय्या यांचा आरोप आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यातलं वैर सर्वश्रुत आहे. महापालिकेतील डपिंग ग्रांऊडवरून सोमय्या यांनी शिवसेना नेते, उध्दव ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्यावर आर्थिक व्यव्हार होत असल्याचे आरोप केले होते. त्याला भाजपनेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनीही साथ दिली होती. इतकंच नाहीतर डंपिंग माफीयाकडून पैसे जात असून त्याची चौकशी झाली पाहिजे असे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यामुळे दुखावलेल्या शिवसैनिकांनी लोकसभेत किरीट सोमय्या यांचे काम करणार नाही अशी भूमिका घेतली होती. विधानसभेत सेना भाजप एकत्र निवडणुका लढले पण सरकार बनवताना मात्र पुन्हा त्यांच्यात कलगीतुरा झाला आणि शिवसेनेने वेगळी चुल मांडली. शिवसेनेने कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसशी महाआघाडी करून सरकार स्थापन केल्याने भाजप नेते संतापले आहेत.भाजप आता शिवसेनेवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाही.

शिवसेनेला अडणीत आणण्याचसाठी खुद्द माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे कामाला लागले आहेत. भाजपच्या रणनीतीचा भाग म्हणून किरीट सोमय्या यांना पुन्हा शिवसेनेच्या विरोधात सक्रिय होण्याचे आदेश केंद्रिय नेतृत्वाकडून देण्यात आल्याचं भाजपमधील सूत्रांनी सांगितलं त्याचाच एक भाग म्हणून किरीट सोमय्या पुन्हा सक्रिय झालेले पहायाला मिळत आहेत. किरीट सोमय्या यांना पुढे करून भाजप शिवसेनेला अडचणीत आणून पुढची रणनिती काय असेल याची झलक दाखवत आहे असं सांगितलं जातं.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997