Home News Update काय घडतंय महाशिवआघाडीत? उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

काय घडतंय महाशिवआघाडीत? उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

courtesy - social media
Support MaxMaharashtra

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. या निवडणूकांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. त्यातच महायुतीमधून शिवसेना(shivsena) बाहेर पडल्यानं महायुतीला सरकार स्थापन करणं शक्य नाही. त्यामुळं शिवसेना, कॉंग्रेस – राष्ट्रवादी अशी महाशिवआघाडी राज्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या संदर्भात तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये सध्या बैठका सुरु आहेत.

हॉटेल ट्रायडंट ला आज कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने किमान समन्वय समितीसाठी 5-5 जणांची नावं निश्चित केली आहेत. याशिवाय मंत्रिपदांचं वाटप कसं असेल, कोणाला किती आणि कोणती मंत्रिपदं दिली जातील. या संदर्भात चर्चा झाली. यामध्ये स्वत: उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. या संदर्भात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(udhav thakeray) यांनी माध्यमांना सूचक प्रतिक्रिया दिली.

‘घाई करू नका. लवकरच निर्णय येईल. चर्चा योग्य दिशेने सुरू झाली आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997