Home News Update ठाकरे सरकार बहुमत चाचणीत पास!

ठाकरे सरकार बहुमत चाचणीत पास!

courtesy- Social media
Support MaxMaharashtra

राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा आज शेवट झाला आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केलं आहे. १६९ आमदारांनी सरकारच्या बाजुने मतदान केलं. तर सरकारच्या विरोधात शून्य मतदान झालं.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil)यांच्या अध्यक्षतेखाली बहुमत चाचणी पार पडली. कामकाज सुरु झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा हंगामी अध्यक्ष म्हणून झाली. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय झाला. बहुमताचा प्रस्ताव अशोक चव्हाण यांनी मांडला. या प्रस्तावाला नवाब मलिक (Nawab Malik) आणि सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी अनुमोदन दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बहुमत चाचणी ही उघड मतदान पद्धतीने करण्यात आली. त्याचं थेट प्रक्षेपणही करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांना ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

भाजपनं विधीमंडळाचं कामकाज असैविधानिकरित्या सुरू आहे असं म्हणत सभात्याग केला. त्यामुळे सरकारच्या विरोधात मतदान झालं नाही. माकप, एमआयएम आणि मनसे असे ४ आमदार तटस्थ राहीले.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997