Home मॅक्स रिपोर्ट कॉपीपेस्ट ठाकरे!

कॉपीपेस्ट ठाकरे!

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. या मेळाव्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार या नेहमीच्या घोषणेसोबत उद्धव ठाकरेंनी काही नव्या आणि महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

उद्धव यांनी राज्यात ३०० युनीटपर्यंत ३० टक्के सवलतीची घोषणा केली आहे.

यासोबत १० रुपयांत जेवण मिळणार आणि १ रुपयामध्ये आरोग्य चाचणी होणार असल्याचंही सांगितलंय. राज्यासाठी या योजना नवीन वाटत असल्या तरी दिल्लीमध्ये या योजना सध्या सुरू आहेत.

दिल्लीच्या आप सरकारने घरगुती वापरासाठीच्या वीजबिलात अनुदान जाहीर केलंय.

१ ऑगस्टला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २०० युनीटपर्यंत वीजबिल माफ करण्यात आल्याची घोषणा केली होती. याशिवाय दिल्ली सरकारतर्फे २०१५ मध्ये जनआहार कॅन्टीन सुरू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये १० रुपयांत जेवण मिळतं.

दिल्ली सरकारची आणखी एक योजना आहे जिचं नाव ‘सबके लिए स्वास्थ योजना’ आहे. या योजनेमध्ये नागरिकांना उपचार आणि औषधं मोफत मिळतात. सरकारने यासाठी ५० रुग्णालय आणि ४० लॅबसोबत करार केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या योजना या निश्चितपणे चांगल्या आहेत. मात्र, त्या आपच्या पावलावर पाऊल ठेऊन कॉपीपेस्ट केलेल्या आहेत.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997