‘मला संपर्क करू नका, मी जातोय’

‘मला संपर्क करू नका, मी जातोय’

437
0
Courtesy : Social Media
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपण भाजप पक्षात अधितकृतपणे प्रवेश करणार असल्याचं आपल्या ट्वीटर पेजवर आज अखेर जाहीर केले आहे. काल शरद पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या प्रदीर्घ चर्चेनंतर उदयनराजे यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवास थांबवला आहे.
त्यानंतर राजे यांची मनधरणी करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी यावर आज पहिली प्रतिक्रिया दिली. ‘मी उदयनराजे यांना संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी आमच्या एका मित्राकडे मेसेज पाठवला की, मला संपर्क करु नका, मी जातोय, उदयनराजे माझे कॉलेजमध्ये सिनिअर होते, तेव्हापासून आमची मैत्री आहे. काल शरद पवारांसोबत आमची बैठक झाली. विधान सभेच्या प्रचाराबाबत चर्चा झाली. महाराजांनी भाजप सरकारच्या कामाबाबत टीका केली. त्यानंतर मी कामाला लागलो. संध्याकाळी अचानक काय झालं कळलं नाही.’ असं म्हणत धनंजय मुंडे यांनी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. राजे गेले, सेनापती गेले, आमच्या सारखे मावळे अजुन आहेत. अजून लढणार.’ असा विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकीत आपण भाजपला टक्कर देणार असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान उदयनराजे भोसले उद्या दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार आहेत.
ट्वीटरवरील आपल्या पोस्ट मध्ये उदयन राजे म्हणतात की, “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या आणि आशिर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम आणि आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.”