Home News Update बुद्धी गहाण ठेवली आहे का काय? उदयनराजे संतापले

बुद्धी गहाण ठेवली आहे का काय? उदयनराजे संतापले

Courtesy: Social Media
Support MaxMaharashtra

छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारं पुस्तक भाजपनं प्रकाशित केल्यानं राज्यातलं वातावरण चांगलंच तापलंय. छत्रपतींचे वंशज संभाजीराजे यांनी आपली नाराजी थेट जाहीर केलीये, पण छत्रपतींचे आणखी एक वंशज उदयनराजे भोसले यांनी मात्र या वादावर प्रतिक्रिया दिली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना केल्यानं छत्रपती संभाजीराजे, शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली नाराजी व्यक्त करत भाजप नेत्यांना खडेबोल सुनावलेत. त्यानंतर उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

उदयनराजे भोसले यांची पत्रकार परिषद

14 जानेवारी आज पानिपत शौर्य दिन, युद्धात कामी आलेल्या सर्वांना आदरांजली

शिवाजी महाराजांकडे महाराष्ट्राच नव्हे जगातील आदर्श व्यक्ती म्हणून पाहिलं जातं, शिवरायांची तुलना अनेकवेळा झाली, लोकांनी बुद्धी गहाण ठेवलीय का माहित नाही, काल-परवाचं पुस्तक पाहून वाईट वाटलं

गोयल नावाच्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केली, महाराष्ट्रात जाऊ द्या, जगात शिवरायांशी कोणाची तुलना होऊ शकत नाही, जाणता राजा म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात, मात्र जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी राजा

जाणता राजा उपमा देताना शिवाजी महाराजांनी त्या काळात काय केलं ते पाहावं, कार्यपद्धतीने जगाला दाखवून दिलं, अनेक जाती धर्मातील लोक माझे जीवलग मित्र, कुठल्याही देशात धार्मिक स्थळी योद्ध्यांचा फोटो नसतो, केवळ आपल्या शिवरायांचा फोटो असतो

छत्रपती शिवरायांशी तुलना सोडूनच द्या, मात्र त्यांच्या जवळपासही कोणी जाऊ शकत नाही

शिवसेनेला जेव्हा नाव दिलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का?

महाशिवआघाडीतून ‘शिव’ नाव का काढलं? 

सत्तेच्या मागे आम्ही कुत्र्यासारखो धावलो नाही

 

 

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997