पुलवामात दोन दहशतवादी ठार, भारताच्या एका जवानाला वीरमरण

पुलवामात दोन दहशतवादी ठार, भारताच्या एका जवानाला वीरमरण

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर दहशतवाद्यांशी लढताना भारताचा एक जवान शहीद झाला असून दोन जखमी आहे.
दरम्यान, चकमक अद्यापही सुरू असल्याचे कळतंय.सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंती पुरामध्ये चकमक झाली. पुलवामा जिल्यातील अवंतीपुरामध्ये परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.