पुणे, नागपूरला दोन नवी विद्यापीठं होणार 

पुणे, नागपूरला दोन नवी विद्यापीठं होणार 

पुणे आणि नागपूरमध्ये दोन स्वयं अर्थ सहाय्यित विद्यापीठांच्या स्थापनेला मंजुरी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. पुण्यात श्री. बालाजी युनिर्व्हसिटी आणि नागपूरमध्ये रामदेव बाबा युनिर्व्हसिटी स्थापन कऱण्यात येणार आहे. या दोन्ही विद्यापीठांमुळं विद्यार्थ्यांना विविध ज्ञानशाखांच्या अध्ययनाची सुविधा मिळणार आहे. प्रचलित सामाजिक आरक्षणासह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या दोन्ही विद्यापीठांमध्ये ४० टक्के जागा आरक्षित असतील.