Home मॅक्स ब्लॉग्ज तेजस्विनी!

तेजस्विनी!

909
0
दिल्लीत मी ज्यावेळेस पत्रकारितेचे धडे गिरवायला सुरवात केली त्यामध्ये नीलम शर्मा यांचा मोलाचा वाटा राहिला. मी नीलम शर्मा मॅडम यांच्या बरोबर ‘बडी चर्चा’ आणि ‘तेजस्विनी’ या डीडी न्यूजच्या महत्वाच्या प्रोग्रॅमसाठी सहाय्यक म्हणून काम करायचो. रमन हितकारी आणि नीलम शर्मा मॅडम यांच्या बरोबर काम करायची संधी मिळणे म्हणजे माझ्या आयुष्यातील मोठी सुवर्णसंधी होती.
तेजस्विनी हा महिलांशी संबंधित प्रोग्रॅम आहे. त्याचे सुरुवातीचे जे मोंटाज (स्वागत गीत) आहे. त्यासाठी भारतातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचे चेहरे निवडायचे होते. मी काही नावे सुचवली आणि मॅडमनी क्षणाचा विलंब न करता सांगितले कि ‘जाओ, तुम्हे जैसे चाहिए वैसे बनाके ले लो’ अणि त्या माझ्या पहिल्या कामाला मॅडमनी शाबासकी दिली. तीन दिवसांनी आम्ही लाईव्ह केले होते. तेव्हापासून आजपर्यंत मॅडमनी माझ्यावर विश्वास ठेवला.
मॅडम जेंव्हा कुठे अँकरिंगसाठी मोठ्या इव्हेंटला जायच्या त्यावेळेस त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या नवीन लोकांना संधी द्यायच्या. “मेरा गला खराब है, चलो आप बात करोगे”. परत कळायचं की मॅडम ठीक आहेत पण माझ्यासाठी ही एक संधी होती त्याचं मला सोनं करायचं आहे.
मॅडमच्या निधनाची बातमी कळाली, डोळ्यासमोर अंधार झालाय सगळा. माझ्या आनंदात आणि दुःखात सहभागी होणाऱ्या मॅडम. काही सांगण्यासाठी मॅडमला फोन केला की म्हणायच्या “खुश है ना?“ आणि दुःखात ‘मै हूँ न यहाँ पे’ म्हणणारा आवाज आता ऐकायला मिळणार नाही.
नीलम मॅडम आप हमेशा साथ रहोगे. भावपूर्ण श्रद्धांजली!
Support MaxMaharashtra

 

– असिफ जमादार

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997