आरेतील वृक्षतोडी विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह, मुंबईकर भरपावसात रस्त्यावर

आरेतील वृक्षतोडी विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह, मुंबईकर भरपावसात रस्त्यावर

आरेतील वृक्षतोडी विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह, मुंबईकर भरपावसात रस्त्यावर
आरे कॉलनीतील 2700 झाडे तोडण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरणाने घेतला आहे. याविरोधात‘’माझ्या परिवारातला एक भाग ‘ही’ झाडं आहेत. ही झाडं आम्ही तोडू देणार नाही – सुप्रिया सुळे अनेक पर्यावरणप्रेमी तसेच आदिवासी बांधव रस्त्यावर उतरत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी आरे कॉलनीतील पिकनिक पॉईंट या ठिकाणी या सर्व आदिवासी बांधवांच्या समस्या समजून घेत पर्यावरण प्रेमींसोबत आज भरपावसात आंदोलन केले.

हे ही वाचा

‘या’ मशीनने आरेतील झाडं वाचवता आली असती…

 ‘आरे’त आंदोलन करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

‘आरे’ आंदोलनात अटक केलेल्या पर्यावरणप्रेमींच्या जामीनासाठी क्राऊडफंडिंग मोहीम

आपण आरे वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करु असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी यावेळी आरे वासियांनी दिलं. त्याच बरोबर मी मुख्यमंत्र्यांशी देखील या विषयावर बोलणार असल्याचं सांगत पर्यायी जागा असताना देखील मेट्रो कार शेड आरे मध्ये आणण्याचा घाट का घातला जात आहे? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला…