Home News Update पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी 20-25 झाडं कापली !

पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी 20-25 झाडं कापली !

123
Courtesy : Social Media

मुंबईत आरे कॉलनीतील झाडं कापण्यात आल्यानंतर सरकारबाबत संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यात होणाऱ्या सभेसाठी (SP) सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानातील सुमारे वीस ते पंचवीस झाडं कापली आहेत.

येत्या गुरुवारी मोदी यांची सभा सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. मैदानात समोरच्या बाजूला व्यासपीठ उभारण्याचं काम सुरू आहे. व्यासपीठ उभारण्यात अडथळा येत असल्यानं ही झाडे तोडण्यात आल्याचे समोर आलं आहे.

काही झाडे निम्म्यापर्यंत तोडले आहेत तर काही झाडांच्या केवळ बुंधा शिल्लक आहे. तर काही झाडं पूर्णपणे कापण्यात आली आहेत. अशी 20-25 झाडं तोडण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं देखील मुख्यमंत्र्यांच्या रथासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या होत्या.

आज सप महाविद्यालयाच्या मैदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होणाऱ्या सभेची जय्यत तयारी भाजपने केली आहे. याठिकाणी प्रसार माध्यमं व नागरिकांना तेथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अनेक प्रतिनिधींनी जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी जाण्यास मज्जाव केला आहे.

Support MaxMaharashtra

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997