मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना तातडीने पत्र, ‘हे’ आहे कारण…

177
मुख्यमंत्री सहाय्यता निधी #COVID19 च्या नावाने स्वतंत्र बँक खात्याची निर्मिती; या खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन #FightingCoronaTogether #WarAgainstVirus

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. आता केशरी शिधापत्रिकाधारकांना 8 रुपये प्रती किलो गहू आणि 12 रुपये प्रती किलो तांदूळ अशा दरात धान्य मिळेल. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच पत्र लिहून संबंधित मंत्रालयाला आवश्यक ते निर्देश देण्याची विनंती केली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या 3 कोटी 8 लाख एपीएल शिधापत्रिकाधारकांना याचा फायदा होईल. त्यासाठी सुमारे 250 कोटी खर्च येणार असून मे आणि जून या महिन्यासाठी हे धान्य दिले जाईल.

सध्या जे धान्य केंद्र सरकारकडून मिळते. त्या व्यतिरिक्त 1 लाख 54 हजार 220 मेट्रिक टन धान्याची मागणी यासाठी करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये किमान आधारभूत किंमतीच्या दराने धान्य देण्याबाबत केंद्राचे जे धोरण आहे. त्याला अनुसरुनच सवलतीच्या दरात धान्य मिळावे अशी मागणी पंतप्रधानांना करण्यात आली आहे.