Home News Update ‘ते’ दोघं पुन्हा एकत्र आले!

‘ते’ दोघं पुन्हा एकत्र आले!

Courtesy : Social Media
Support MaxMaharashtra

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा दिला. आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. हा प्रसंग अजुनही महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. 70 तासातच हे सरकार पडलं. मात्र, अजित पवार(Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस(Devendra fadnavis) यांची या निमित्ताने चांगलीच गट्टी असल्याचं समोर आलं.

मात्र, ते पुन्हा एकदा एकत्र आले. निमित्त होते. संजय मामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नाचे. हे नेते आले होते लग्नाला. मात्र, लग्न राहिले बाजूला दोघांच्या गप्पाच जास्त रंगल्या होत्या.

हे ही वाचा…

एकनाथ खडसे शरद पवार यांच्या भेटीला चर्चा सुरू
नवरत्न विकण्यासाठीच नागरिकत्व कायद्यात सुधारणा.. – प्रकाश आंबेडकर
समाजसेवेची भूक भागवणाऱ्या जेवणाची गोष्ट

विशेष म्हणजे तिकडं नवरा नवरी नवीन संसार थाटत असताना, यांचा देखील नवीन राजकीय संसार पुन्हा एकदा सुरु होतो की काय? या चर्चांना पुन्हा एकदा उधान आलं आहे. थोडक्यात महाआघाडीच्या काही नेत्यांनी महाआघाडीच्या नव्या संसारात आणखी नवीन काही घडतं की काय? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा नवा राजकीय संसार सुरु करतात की काय? असाच प्रश्न या भेटीनंतर उपस्थित केला जात आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997