मुंबईत पेट्रोल ७८.६२ रुपये प्रतिलीटर तर डिझेल ६९.८५ रुपये प्रति लीटर

मुंबईत पेट्रोल ७८.६२ रुपये प्रतिलीटर तर डिझेल ६९.८५ रुपये प्रति लीटर

५ जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या भावात चढ-उतार होत आहे. अर्थसंकल्पात सरकारने तेलावर २ रुपये अतिरिक्त कर वाढवला होता. त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर पेट्रोल दोन रुपयांनी महागलं. (सोमवार) आज देशात पेट्रोल चे भाव स्थिर आहे तर डिझेलचे भाव कमी झाल्याचे पाहायला मिळते. राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या भावात काही बदल झाले नसून पेट्रोलचे भाव ७२.९६ रुपये प्रतिलीटर आहे तर डिझेलचे भाव १० पैशांनी कमी होऊन ६६.५९ रुपये प्रतिलीटर मिळत आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये पेट्रोल चे भाव ७८.६२ रुपये प्रतिलीटर असून डिझेल ६९.८५ रुपये प्रतिलीटर झालं आहे.