जुन्या पेन्शनसाठी हजारो अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर; काय आहे मागणी?

जुन्या पेन्शनसाठी हजारो अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर; काय आहे मागणी?

२००५ नंतर शासकीय सेवेमध्ये रुजू झालेल्या कर्मचार्यांना जुनी पेन्शन सुरु व्हावी या मागणीसाठी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो कर्मच्याऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सरकार विरोधी घोषणा दिल्या.
या मोर्चामध्ये सहा जिल्ह्यांमधुन जिल्हा परिषदेचे शिक्षक, शिक्षिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगर पालिका, महसूल विभाग, कृषी विभाग अशा विविध 32 संघटनांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
ज्या प्रमाणे आमदार, खासदार यांना शासनाने पेन्शन लागू केली त्याचप्रमाणे शासनाने आम्हाला सुद्धा आमची जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी मोर्चामध्ये सहभागी झालेले अमरावती महानगर पालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी केली.