Home मॅक्स रिपोर्ट ‘तेरा दिवस प्रेमाचे’ विनोदी नाटक आजपासून रंगभूमीवर

‘तेरा दिवस प्रेमाचे’ विनोदी नाटक आजपासून रंगभूमीवर

Support MaxMaharashtra

मुंबई – मराठी नाटक आणि प्रेक्षकांच अतूट नातं आहे. अनेक प्रेक्षक मराठी नाटकाची आतुरतेने वाट पाहत असतात. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे याचं ‘तेरा दिवस प्रेमाचे’ हे विनोदी नाटक आजपासून रंगभूमीवर येणार आहे. १६ ऑगस्टपासून या नाटकाचे सहा शुभारंभ प्रयोग होणार आहे. दादर येथील शिवाजी नाट्यगृहात १६ ऑगस्टला रात्री ८ वाजता. १७ ऑगस्ट सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली, १८ ऑगस्ट गडकरी रंगायतन ठाणे, १९ ऑगस्ट कालिदास नाट्यगृह मुलुंड, २० ऑगस्ट प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली आणि पुन्हा २१ ऑगस्ट शिवाजी नाट्यगृह दादर येथे या नाटकाचे प्रयोग होणार आहे.

शिरीष राणे दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती अनुराधा सामंत यांनी केलीय. तर नाटकाचे लेखन आनंद म्हसवेकर यांनी केलाय. तर संगीत मयुरेश माडगांवर यांनी दिले आहे. तर नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना विनय आनंद यांनी केली आहे. या नाटकात अरुण नलावडे, माधवी दाभोळकर, संजय क्षेणकल्याणी शर्वरी गायकवाड, देवेश काळे, संजय देशपांडे आणि मेघना साने यांची प्रमुख भूमिका आहेत.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997