मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना जागा नाही…

मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना जागा नाही…

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या रविवारी 16 जून रोजी झालेल्या विस्तारात एकाही महिलेला जागा पटकावता आली नाही. 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश फडणवीस मंत्रिमंडळात करण्यात आला.


क्षेत्रिय राजकारणाचा विचार करून राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न या विस्तारामध्ये करण्यात आला आहे. सध्या मंत्रिमंडळामध्ये पंकजा मुंडे कॅबिनेट तर विद्या ठाकूर राज्यमंत्री अशा दोनच महिला मंत्री आहेत. या दोनही मंत्री भारतीय जनता पक्षातर्फे आहेत. शिवसेना तसंच मित्रपक्षांनी एकाही महिलेला प्रतिनिधीत्व दिलेले नाही.

राज्यमंत्रिमंडळाचं गठन करताना साधारणतः समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधीत्व मिळेल अशी रचना केली जाते. देवेंद्र फडणवीस सरकारने मात्र असा विचार केलेला दिसत नाही, हेच आज स्पष्ट झालं आहे.