Home News Update एकाच घरात दोन महत्त्वाची पदं, काँग्रेसमध्ये घराणेशाहीची परंपरा कायम

एकाच घरात दोन महत्त्वाची पदं, काँग्रेसमध्ये घराणेशाहीची परंपरा कायम

satayjit tambe, balasaheb thorat | सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात
काँग्रेस पक्षसंघटनेच्या पदांवरील नियुक्त्या या लोकशाही पद्धतीनं घेतल्या जाव्यात यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी संघटनात्मक निवडणूका घेत नियुक्त्या करण्याची पद्धत रूजू केली होती. त्याच काँग्रेसमध्ये अजूनही घराणेशाही कमी झालेली दिसत नाही. युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी घेतलेल्या निवडणूकीतही सत्यजित तांबे हेच निवडून आले होते. तर आता प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित यांचे मामा बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागल्यानं. काँग्रेसमधील घराणेशाहीला आळा घालण्यासाठीचा राहुल गांधींचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला आहे.
२०१८ मध्ये युवक काँग्रेसच्या झालेल्या निवडणुकांमध्ये सत्यजित तांबे हे निवडून आले होते. तर उपाध्यक्षपदी माजी मंत्री सुभाष झनक यांचे चिरंजीव अमित, माजी मंत्री आणि आजच जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारणीमध्ये कार्याध्यक्षपदी निवड झालेले डॉ. नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल हे निवडून आले होते.
लोकसभा निवडणूकीनंतर राहुल गांधी यांनी पक्षातील उणीवा जाहीरपणे एका पत्राद्वारे सविस्तरपणे मांडल्या होत्या, त्यात घराणेशाहीच्याही अनुषंगानं अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतरही काँग्रेसनं आज जाहीर केलेल्या यादीच्या अनुषंगानं पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घराणेशाही असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद आणि युवक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपदही एकाच कुटुंबाकडे आलं आहे.

Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997