Home News Update चांद्रयान-२’ विक्रम लँडरचा लागला ठावठिकाणा

चांद्रयान-२’ विक्रम लँडरचा लागला ठावठिकाणा

Support MaxMaharashtra

अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेनं चांद्रयान-२  मोहिमेतील विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधून काढला आहे. भारताचं ‘चांद्रयान-२’ अवकाशात झेपावल्या नंतर संपुर्ण जग भारताच्या नव्या विक्रमाकडे लक्ष लावून होता. पंरतु विक्रम लँडर हे चांद्रयानावर आदळल्यानंतर भारताच्या अपेक्षा दुरावल्यात, पंरतु या अगोदर भारताने आपलं ९० टक्के मिशन पुर्ण केलं होते.

‘चांद्रयान-२’ चे विक्रम लँडर ज्या जागेवर आदळले. त्या भूमीपासून ७५० मीटर लांब अंतरावर विक्रम लँडरचे तीन अवशेष आढळले, ‘नासाने’ एक किलोमीटर एवढ्या अंतरावरुन विक्रमची छायाचित्र टिपली आहेत. मात्र, कोणत्या भागातील ही जागा आहे. हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. याचं संशोधन होणार असल्याचे नासाने ट्विट केले आहे.

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997