Home News Update देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाला करतील राम राम?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाला करतील राम राम?

Support MaxMaharashtra

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे. निवडणूक होऊन १४ दिवस उलटली तरीही सत्तेचा पेच सुटला नाही. महायुतीला जनादेश दिल्यानंतर देखील सत्ता स्थापन होत नाहीय, त्याचप्रमाणे शिवसेना आणि भाजप यामध्ये मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु आहे.

शिवसेना आजही हट्ट धरुन आहे मुख्यमंत्री आमचाचं असावा आणि एकीकडे भाजपा मुख्यमंत्री पद सोडवायला तयार नाहीय. या दोघी पक्षाच्या हट्टामुळे सत्ता स्थापनेच चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे विधानसभा बरखास्त होत असतांना राज्यातील सरकारचा कार्यकाळ संपुष्टात येतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्यापांलाची भेट घेउन आपल्या पदाचा राजीनामा आज देउ शकतात. विधानसभा बरखास्त झाल्यानंतर राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी प्रकिया सुरु करतील. त्याचप्रमाणे सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला राज्यपाल सत्ते स्थापनेसाठी निमंत्रीत करु शकतात.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997