Home News Update अखेर महापरीक्षा पोर्टल बंद!

अखेर महापरीक्षा पोर्टल बंद!

Support MaxMaharashtra

अनेक विद्यार्थी संघटनांच्या मागणीनंतर अखेर महापोर्टल बंद करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक लोकप्रतिनीधींनी केलेला पाठपुरावा आणि समितीने दिलेल्या अहवालानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं कळतंय मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

भाजप सरकारच्या काळात घोषणा करण्यात आलेल्या ७२ हजार जागांच्या मेगाभरतीची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी युद्धपातळीवर हलचाली सुरू आहेत. ही भरतीप्रक्रीया महापोर्टलच्या माध्यमातून नाही तर संबंधित विभागामार्फत होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील सुत्रांनी दिलीय.

सरकारी भरती प्रक्रीयेसाठी भाजप सरकारकडून ‘महापरीक्षा पोर्टल’ची निर्मिती करण्यात आली होती. मात्र या पोर्टलमध्ये अनेक त्रुटी असल्याचं सांगत अनेक विद्यार्थी संघटना, राजकीय मंडळींनी पोर्टल बंद करण्याची मागणी केली होती.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997