Home मॅक्स ब्लॉग्ज नदीजोड प्रकल्पाची संकल्पना : जाळ्यात नको फसूया! 

नदीजोड प्रकल्पाची संकल्पना : जाळ्यात नको फसूया! 

5089
0
जागतिक भांडवलशाहीला अशा भांडवल सधन आयडिया हव्याच आहेत. एका भूभागात महापूर आणि दुसरीकडे पाण्याचे दुर्भिक्ष आहे. साहजिकच कोणालाही असे वाटेल की एका ठिकाणीचे अतिरिक्त पाणी ज्या ठिकाणी तुटवडा आहे तेथे वळवले की प्रश्न सुटेल. पण एखादी संकप्लना प्रयोगशाळेत अपील झाली तरी तिची अंमलबजावणी करतांना अनेक गंभीर, गुंतागुंतीचे पदर पुढे येतात. त्यातीलच एक नदीजोड प्रकल्प
हजारो, लाखो वर्षांचे पाण्याचे छोटे मोठे प्रवाह म्हणजे माणसांनी बनवलेले कालवे नव्हेत. छोट्या मोठ्या नद्यांनी पूर्ण जीवसृष्टीला आपल्या कवेत घेतलेले असते. तुम्ही जबरदस्ती करून त्यांची दिशा वळवलीत तर ते प्रवाह काय प्रतिक्रिया देतील ते बघायला आताची पिढी जिवंत देखील असणार नाही.
नदीजोड प्रकल्प हा अतिशय भांवडल सघन प्रकल्प असेल. भांडवलाची भरमार असणाऱ्या जागतिक भांडवलाला भांडवल रिचवणरे असे प्रकल्प हवेच आहेत. जागतिक वित्तसंस्था आपल्या देशाला भरपूर कर्जे द्यायला तयार असतील. त्यात भांडवल तर रिचवले जाईलच पण सिमेंट, पोलाद देखील रिचवले जाईल. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यातून पोलिटिकल मायलेज मिळू शकते. कोणत्याही सत्ताधारी पक्षाला हे आवडेल
एकदा जनतेकडून नदीजोड प्रकल्पांची मागणी आली की जागतिक भांडवलशाही आणि तिचे भारतीय पार्टनर यांना ते हवेच आहे. हा विषय अतिशय गंभीर आहे आणि त्यात तज्ज्ञांची मते केंद्रस्थानी असली पाहिजेत. कॉमन सेन्सवर आधारित त्यावरच्या चर्चा शक्यतो टाळायला हव्यात. कमी भांडवल लागणारे, तरी देखील खूप जास्त परतावा (रेट ऑफ रिटर्न) देणारे, जनता स्नेही, पर्यावरण स्नेही अनेक उपाय आहेत ते सार्वजनिक व्यासपीठांवर पुढे आणले पाहिजेत
– संजीव चांदोरकर

Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997