Home News Update राऊत गिरीच्या मर्यादा….

राऊत गिरीच्या मर्यादा….

229
0
Support MaxMaharashtra

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 1नाही. 1 दिवस उलटले तरी देखील महाराष्ट्रात अजून सरकार स्थापन झालेले भाजप- शिवसेना युतीत लढलेत, भाजप 105 तर शिवसेना 56 जागांवर निवडून आलाय. आता सत्ता स्थापन करायची वेळ आली असताना शिवसेना आमचं ठरलं होते असे सांगत 50-50 फॉर्मुलावर अडून बसलीये. एवढंच नव्हे तर शिवसेनेला मुख्यमंत्री पदाबरोबरच इतर मह्व्ताची खाती देखील हवी आहेत. तर इकडे भाजप नेते आणि फडणवीस पुढील 5 वर्षे भाजपचाच मुख्यमंत्री असेल असं सांगतायत.

आता सत्ता-स्थापनेवरून एवढं राजकारण रंगत असताना आपल्या विधानावरून आणि सामानाच्या अग्रलेखामुळे सतत चर्चेचा विषय बनून राहणारे, सामनाचे संपादक तसेच शिवसेना खासदार संजय राऊत गप्प बसतील तर नवलंच. गेले काही दिवस संजय राऊत शिवसेनेची भूमिका घेऊन सतत मीडिया समोर येताना दिसतायत. सध्या सर्वांचे लक्ष लागलेलं असतं राऊत आज नक्की बोलणार काय. याच विषयी जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई काय म्हणतायत, पहा विडिओ…..

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997