Home News Update प्रेमप्रकरणातून झालेल्या हत्येला वेगळं वळण; तरूणीच्या आईची पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार

प्रेमप्रकरणातून झालेल्या हत्येला वेगळं वळण; तरूणीच्या आईची पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार

Courtesy : Social Media
Support MaxMaharashtra

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात प्रेम प्रकरणातून ६ जानेवारीला प्रणिता कोंबे या १८ वर्षीय महाविद्यायलीन तरुणीची चाकूने भोसकून माथेफेरूने निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर या माथेफिरूने स्वतःही घाव मारून घेतले होते. या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं आहे.

माझ्या मुलीच्या हत्येमागे ठाणेदारच असल्याचा धक्कादायक आरोप तरुणीच्या आईने केला आहे. हत्येच्या काही दिवसांपूर्वी आरोपी सागर तितुरमारे याच्याविरोधात तक्रार देऊनही ठाणेदार रवींद्र सोनवणे यांनी कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित तरूणीच्या आईने केला आहे.

हत्येच्या काही दिवस अगोदर पोलीस निरीक्षक सोनवणे हे मुलीला भेटायला जबरदस्ती घरी येत होते, तिला वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून त्रास देत होते. तिच्या कॉलेजमध्ये जात भेटण्याचा प्रयत्न करत होते, असंही या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे प्रणिता कोंबे हत्याकांडाला आता धक्कादायक वळण प्राप्त झाले आहे.

जुलै २०१९ मध्ये पीडितेला आरोपी सागरने फूस लावून पळवून नेले होते. तेव्हा दत्तापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांनी पीडितेचा शोध लावून ४ दिवसांत तिला परत घरी आणले होते. यावेळी पोलीसांत तक्रार करु नका, त्यामुळे तुमच्या मुलीची बदनामी होईल, असं सांगून कारवाई पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी थांबवली असल्याचंही पिडीतीच्या आईचं म्हणणं आहे. हे प्रकरण चौकशी करिता सीआयडीकडे द्यावे अशी मागणी अमरावती पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

पीडितेच्या आईने गंभीर आरोप केल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तरुणीच्या हत्येचा तपास मोर्शीच्या महिला पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या हत्येतील आरोपी सागर तितुरमारे याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांकडून ४ दिवसांत योग्य चौकशी केली जाईल आणि पोलीस अधिकारी दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997