Home Uncategorized कोण लावतंय मराठा विरुध्द खुला प्रवर्ग असा वाद ?

कोण लावतंय मराठा विरुध्द खुला प्रवर्ग असा वाद ?

Support MaxMaharashtra

महाराष्ट्र शासनाने 2014 मध्ये खुल्या प्रवर्गातून वेगवेगळ्या पंदासाठी नविन उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, ११ जुलै २०१९ मध्ये शासनाने GR काढला की, खुल्या प्रवर्गातून ज्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत त्यांच्या नियुक्त्या संपुष्टात आणून मराठा आरक्षीत मुंलाना त्यांच्या जागी नियुक्ती करा. त्यामुळे खुल्या प्रवर्गातल्या मुलांना काढण्यात आलं आणि त्यांच्या जागी मराठा आरक्षीत उमेदवारांना नोकऱ्या देण्यात आल्या.

शासनाची स्प्ष्ट भूमिका नसल्यामुळे खुल्या प्रवर्गातल्या २७०० मुलांवरती अन्याय झाला आहे. या मुलांपैकी कोणाचे लग्न झाले आहे यामुळे संसार कसा चालवायचा हा प्रश्न या लोंकाना भेडसावत आहे. नोकरी गेल्यामुळे बऱ्याच लोकांचे लग्न मोडलं. आयुष्यभरासाठी केलेली मेहनत एका रात्रीत भंग झाल्यामुळे आम्ही जगायचं कस असा सवाला या लोकांनी प्रशासनाला केला आहे. आमची शासनाला विनंती आहे ११ जुलैचा GR तात्काळ रद्द करुन आमच्या नोकऱ्या आम्हाला परत द्याव्यात. पाहा हा व्हिडीओ….

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997