भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा उतरती कळा

भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा उतरती कळा

सर्वात मोठी लोकशाही आणि अर्थव्यवस्था असलेल्या भारताला मंदीच्या ओघात अजुन मोठा फटका बसलाय. जगातील कॉम्पिटिटिव्ह इकोनॉमी अर्थात स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत भारताची 10 स्थांनानी घसरण झालीय. आता या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्थता 68 व्या स्थानावर आहे. यामुळे मंदीच्या विळख्यातुन निघण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सरकारला धक्का बसलाय.

वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमने जाहीर केलेल्या यादीत अगोदर भारत 58 व्या क्रंमाकावर होता. मात्र आता ब्राझीलसह ब्रीक्स देशामध्ये खराब कामगीरी करणाऱ्य़ा अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. या क्रमवारीत ब्राझीलला ७१ वे स्थान दिले गेले तर चीन आणि अमेरिका दरम्यान चालत असलेल्या व्यापारी युद्धामुळे अमेरिकेला आपले पहिले स्थान गमावले असून सिंगापूरने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ही क्रमवारी प्रसिद्ध करतांना सांगितले की, भारत आर्थिक स्थिरतेच्या बाबतीत अजूनही उत्तम स्थितीत आहे. देशाचे आर्थिक क्षेत्र खूप विस्तृत आहे मात्र, बॅड लोनशी झुंजत असलेले बॅकिग क्षेत्र हे अर्थव्यवस्थेशी झुंजत आहे. त्यामुळे भारताला याकडे लक्ष देण्याची गरज आहे.