Home News Update घोषणा हवेत विरल्या; पुलवामा शहीदांच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीशिवाय अन्य कसलीही मदत नाही

घोषणा हवेत विरल्या; पुलवामा शहीदांच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीशिवाय अन्य कसलीही मदत नाही

221
0
Support MaxMaharashtra

पुलवामा हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या जवानांच्या कुटुंबियांसाठी केंद्र आणि त्या त्या राज्यातील सरकारांनी मदतीची घोषणा केली होती. अनेक अश्वासनं दिली होती. मात्र, त्यातील बहुतांश अश्वासनं सत्यात उतरली नसल्याचं चित्र आहे.

पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुंबीयांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाखांची मदत जाहीर केली होती. दुसऱ्याच दिवशी त्या मदतीचा धनादेश कुटुंबीयांना प्रदान करण्यात आला. मात्र, त्यासोबत घोषणा केलेली ५ एकर जमीन, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी आणि इतर मदत अद्यापही मिळालेली नाही.

तत्कालीन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शहिदांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन प्रत्येकी ५ एकर जमीन देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा अद्यापही हवेतच आहे.

जमीन मिळण्यासाठी या कुटुंबीयांनी सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, जमीन देण्यासंदर्भात निर्णय झाला नसून त्याची प्रक्रिया प्राथमिक स्तरावरच असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

दोन्ही कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारीही राज्य शासनातर्फे उचलण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र तसे काहीही झाले नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने आर्थिक मदतीसोबत शहीदांच्या कुटुंबीयांना पेट्रोल पंप आणि शेती देण्याची घोषणा केली होती. मात्र यापैकी काहीही मिळाले नसल्याचं राजपूत परिवाराने सांगितलंय.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997