काँग्रेसने पाठ्यपुस्तकातून हटवला सावरकरांचा ‘वीर’ उल्लेख

काँग्रेसने पाठ्यपुस्तकातून हटवला सावरकरांचा ‘वीर’ उल्लेख

जयपूर : राजस्थानमधील काँग्रेस सरकारने पाठ्यपुस्तकात बदल करत विनायक दामोदर सावरकर यांच्या नावापुढील ‘वीर’ हा उल्लेख टाळला आहे. अशोक गेहलोत सरकारने पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केले आहेत. त्या बदलांमध्ये सावरकरांच्या नावा आधी येणारा ‘वीर’ हा उल्लेख टाळला आहे. राजस्थान बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केला आहे.
पाठ्यपुस्तकांमधील बदलांसंदर्भात एक समिती नेमली होती. या समितीने १३ फेब्रुवारीपासून दिलेल्या सूचनांच्या आधारे हे बदल करण्यात आले आहेत. आधी असलेल्या पुस्तकांमध्ये काय काय बदल केले गेले?  हे या समितीने सूचवले आहे. आधीच्या पुस्तकांमध्ये ज्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या चळवळीचा उल्लेख होता त्या ठिकाणी सावरकरांच्या नावापुढे वीर ही उपाधी दिली होती. मात्र आता नव्याने छापलेल्या पुस्तकांमध्ये हा उल्लेख नाही.
जुन्या पुस्तकात उल्लेख काय ?
वीर सावरकर असं त्यांच्या नावपुढे लिहिण्यात आलं होतं. सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात काय व कसं योगदान दिलं हे या मजकुरात देण्यात आलं होतं.
नव्या पुस्तकात काय ?
स्वातंत्र्य चळवळीतील नेते या मजकुरात विनायक दामोदर सावरकर असं छापण्यात आले आहे. त्यांच्या नावपुढची वीर ही उपाधी हटवण्यात आली आहे. सेल्युलर जेलमध्ये सावरकारांचा छळ करण्यात आला असा उल्लेख नव्या मजकुरात आहे. एवढंच नाहीतर सावरकरांनी स्वतःला सन ऑफ पोर्तुगाल म्हटल्याचा उल्लेख या माहितीत केला गेला आहे.