Home मॅक्स रिपोर्ट ‘प्रशासन ब्रम्हनाळसोबत निष्काळजीपणाने वागलं!’

‘प्रशासन ब्रम्हनाळसोबत निष्काळजीपणाने वागलं!’

89
ब्रम्हनाळ गावातील पूराचं पाणी ओसरतंय तसं तेथील प्रशासनाने लोकांच्या जीवाशी केलेला खेळ पुरग्रस्तांनी व्यक्त केलेल्या रागातून समोर येत आहे. ब्रह्मनाळ दुर्घटनेत प्रशासनाच्या निष्काळजीमुळे १७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले असा गावकऱयांचा आरोप आहे. आपल्या नातलगांना वाचवण्याचा प्रयत्न, त्यांचे मृतदेह पाण्यातून काढतानाचे दुर्दैवी प्रसंग काही केल्या त्यांच्या डोळ्यासमोरून जात नाहीत. गावकरी त्या आठवणीतून असंख्य वेदना आणि मनस्ताप सहन करत आहेत. सोबतच प्रशासनाविषयी लोकांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
असाच एक प्रसंग सांगताना गावकरी धनपाल जितू वडेज यांचा राग आणि अश्रू दोन्हीही अनावर झाले. त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग हा सांगितला. “प्रांत (अधिकारी) आमच्याशी इतकं निष्काळजी वागला की, सांगताही येत नाही. प्रांताला आम्ही फोन केला पण त्यानं काही दादच दिली नाही. तुमचा एरिया पाण्याखाली येतच नाही अशी त्याची भाषा होती. त्या संध्याकाळी प्रेतं पाण्याबाहेर काढायाची साधनंही त्यांच्याकडे नव्हती. मी माझ्या अंगावरची चादर दिली मग त्यांनी प्रेतं बाहेर काढली.”
बुडालेल्या बोटीत धनपाल यांच्यासोबत त्यांचे चार नातलग, एक मुलगी आणि तीन नातवंड होती. त्यापैकी केवळ पाच जणांना ते वाचवू शकले. पण र्दुदैवाने एक नात आणि मुलीचे प्राण ते वाचवू शकले नाहीत. जर योग्यवेळी सरकारची मदत मिळाली असती तर मुलगी, नातं आणि अनेक गावकरी वाचले असते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
Support MaxMaharashtra

 

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997