Home News Update शिवथाळीच्या अटी आणि शर्ती… विरोधकांची टीका ‘आधार’हीन  

शिवथाळीच्या अटी आणि शर्ती… विरोधकांची टीका ‘आधार’हीन  

Courtesy : Social Media
Support MaxMaharashtra

ठाकरे सरकारची बहुचर्चित शिवथाळी योजना सुरवातीपासुनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. शिवथाळी लाभार्थ्यांसाठी घातलेल्या नवीन अटींमुळे त्यात आता नवीन भर पडली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डाची सक्ती करण्यात आली आहे. लाभार्थीचा फोटो जुळला तरच ग्राहकाला दहा रुपयात थाळी मिळेल अशी अट घातली असल्याची टिका विरोधक करत आहेत. मात्र सरकारने अशी कोणतीही अट नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘शिवभोजन’ योजनेसाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

येत्या 26 जानेवारीपासून राज्यात ‘शिवथाळी’ उपलब्ध होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेनेनं आपल्या जाहिरनाम्यात १० रुपयात ‘शिवभोजनथाळी’ची घोषणा केली होती. राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतरही किमान समान कार्यक्रमात ही योजना कायम ठेवण्यात आली. त्यादृष्टीनेच शिवसेनेनं योजना राबवताना महत्वाच्या शहरांसह हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी सुरूवात केली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसाला १९५० शिवभोजन थाळ्या दिल्या जाणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याला २५०, ठाण्याला १३५०, औरंगाबादला ५००, पुण्याला १००० आणि पिंपरी चिंचवडला ५०० थाळी मिळतील.

शिवभोजन योजनेअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या शिवथाळीमध्ये ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम वरण व दीडशे ग्रॅम भात मिळेल. रेल्वे स्थानक, रुग्णालय अशा ठिकाणी ही योजना राबवली जाईल.

शिवभोजनालय चालवण्यासाठी संबंधिताकडे स्वत:ची पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत शिवथाळी उपलब्ध असेल. भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल. एका भोजनालयात किमान ७५ ते कमाल १५० थाळी भोजन उपलब्ध होईल.

शिवभोजन थाळी अटींशर्तींमुळे सोशल मिडीयावर चर्चेचा विषय झाली आहे. राजकीय वर्तुळात ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीका केली जातेय.

“सरकारने गरिबांची चेष्टा लावलीय. 10 रुपयात जेवणाची थाळी मिळणार आहे फुकट नाही. आहो गरीबाला जेवू घालताय का त्याची थट्टा करताय. असं आम्ही या सरकारला करु देणार नाही. कोणत्याही अटीशर्ती विना भुकेलेल्यांना जेवण मिळालचं पाहीजे” असं भाजप नेते राम कदम यांनी म्हंटलं आहे.

तर, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवथाळीसाठी आधार कार्ड कशाला मागता पासपोर्ट मागा अशी टीका करत थाळीसाठी लावलेल्या अटीशर्थीवर थाळी मिळवण्यापेक्षा पासपोर्ट मिळवणे अधिक सोपं आहे असं म्हटलं आहे. पाहा व्हिडीओ…

 

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997