आकाशात उडणारी टॅक्सी सेवा सुरु होणार

आकाशात उडणारी टॅक्सी सेवा सुरु होणार

सौजन्य - The Merkle Hash
आकाशात उडत असलेल्या टॅक्सीतुन आता प्रवास करणे शक्य होणार आहे. आतापर्यंत आपण विमान, हेलीकॉप्टर इतर वाहतुकीच्या साधनांचा वापर केला आहे. मात्र, पहिल्यांदाच आकाशातून उडत जाणाऱ्या टॅक्सीतून प्रवास करायला मिळणार आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित जगातील पहिली इलेक्ट्रिक टॅक्सीची यशस्वीरित्या चाचणी केली गेली. या टॅक्सीची सेवा पुढील वर्षांपासून सुरु होणार आहे. आकाशात उडत जाणाऱ्या या टॅक्सिचे नाव व्होल्प्प्टर असून जर्मन कंपनीने बनवली आहे. जर्मन कंपनीने असे म्हटले की ही पहिली भरलेली टॅक्सी असेल जी सरळ (उभ्या) टेक ऑफ आणि लँडिंग घेण्यास सक्षम असेल. सुरक्षिततेची मजबूत व्यवस्था असेल. प्रत्येक फ्लाइटच्या अगोदर रोबोट बॅटरी बदलेल.

गेल्या महिन्यात बर्लिनमधील ग्रीनटेक फेस्टिव्हलमध्ये ही टॅक्सी आकर्षण केंद्र होती. पुढच्या 10 वर्षांत दर एका तासाला एक लाख प्रवासी या इलेक्ट्रिक टॅक्सितून प्रवास करतील. ही टॅक्सी पूर्णपणे प्रदूषण मुक्त असून आवाजही करणार नाही. सुरुवातीला दोन व्यक्तींना 27 कि.मी. पर्यंत वाहून नेण्याची या टॅक्सीची क्षमता असेल.

रोसबर्गच्या म्हणण्यानुसार, टॅक्सी पुढच्या वर्षाच्या अखेरीपर्यंत उडण्यासाठी तयार होईल. टॅक्सिची सेवा दुबई, सिंगापूर आणि जर्मनीसारख्या ठिकाणी सुरु केली जाईल. ही टॅक्सी सेवा क्रांती करेल. या टॅक्सिचे भाडे इतर टॅक्सीसारखे असणार आहे. ही सेवा अत्यंत स्वस्त असेल. उबेर ९ जुलैपासून ‘उबेर कॉप्टर’ सेवा सुरू करणार आहेत.