Home News Update पी चिदंबरम यांना जामीन, ‘या’ अटीवर केला जामीन मंजूर

पी चिदंबरम यांना जामीन, ‘या’ अटीवर केला जामीन मंजूर

courtesy- Social media
Support MaxMaharashtra

आयएनएक्स मीडिया (INX Media) प्रकरणी गेल्या १०५ दिवसांपासून अटकेत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस (Congress) नेते पी चिदंबरम (P Chidambaram) यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांना २१ ऑगस्ट ला दिल्लीमध्ये सीबीआयने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली होती.

हे ही वाचा…

मुंबईत किती आदिवासी राहतात, हे तुम्हाला माहिती आहे का?
८० टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या, ही घोषणा कागदावरच राहू शकते…
सायनचं शासकीय रुग्णालय व्हेंटीलेटरवर!

दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर ते गेल्या १०६ दिवसांपासून या प्रकरणात CBI आणि ED ने दाखल केलेल्या गुन्ह्यात ते अटकेत होते. न्यायालयाने जामीन मंजूर करताना त्यांना परदेशात जाण्यास मनाई केली आहे. 2 लाख रुपये रकमेवर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच जामीन मंजूर झाल्यानंतर या प्रकरणासंदर्भात माध्यमांशी साक्षात्कार (मुलाखत) देण्यास मनाई केली आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997