Home News Update सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या कक्षेत…

सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या कक्षेत…

RTI, Right to information, supreme court, news, marathi news
Support MaxMaharashtra

सर्वोच्च न्यायालय हे माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठानं दिला आहे. या घटनापीठात डी. वाय. चंद्रचूड, दीपक गुप्ता, एन. व्ही. रमण्णा आणि संजीव खन्ना या पाच सदस्यांचा समावेश आहे.

महाशिवआघाडी टिकणार का?
वाटाघाटीबद्दल योग्यवेळी योग्य बैठका होतील – बाळासाहेब थोरात
राष्ट्रपती राजवटीचा शिवसेनेला असाही दणका..

सरन्यायाधीशाचं कार्यालय हे “सार्वजनिक” असून ते माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत येतं, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयानं जानेवारी 2010 मध्ये दिला होता. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सेक्रेटरी जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीवर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला.

घटनात्मक लोकशाहीमध्ये न्यायाधीश कायद्यापेक्षा वरचढ असू शकत नाही. न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणली तर त्यामुळे न्यायपालिकेच्या न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला कुठेही नुकसान पोहोचत नाही.

असं न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997