EVM विरोधातील ‘तात्काळ’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने “यामुळे” फेटाळली

EVM विरोधातील ‘तात्काळ’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने “यामुळे” फेटाळली

नवी दिल्ली: EVM द्वारे निवडणूका घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिका न्यायालयायाने फेटाळून लावली आहे. निवडणूका बॅलेट पेपरने घेण्यासंदर्भातील याचिका मनोहर शर्मा यांनी दाखल केली होती. यावर तात्काळ सुनावणीची मागणी मनोहर शर्मा यांनी केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणीस मात्र, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. यापूर्वीही EVMबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. सत्ताधारी भाजप EVM मशिन हॅक करून निवडणूका जिंकत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे निवडणूका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली जात आहे.

EVMबाबत आरोप

लोकसभा निवडणुकीपूर्वीही 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत EVM आणि VVPAT मधील 50 टक्के मतांच्या मोजणीची मागणी केली होती. तर, निकालानंतर नारायण राणे, शरद पवार, अजित पवार, तसंच काँग्रेसच्या काही नेत्यांनी EVMमध्ये गडबड असल्याचा आरोप केला होता.