निवडणुका होई पर्यंत खाली बघा – जे.पी. नड्डा

निवडणुका होई पर्यंत खाली बघा – जे.पी. नड्डा

achhe din, bjp, congress, jp nadda, marathi news,
नरेंद्र मोदींनी ( Narendra Modi ) देशात काम करण्याची संस्कृती आणली आहे. व्होट बँकेच्या मठाधिशांना लोकांनी नाकारलंय. जे विकासासाठी काम करतात त्यांनाच लोकं निवडून देतात. ही नवीन संस्कृती निर्माण झालीय ही संस्कृती आपल्याला पुढे न्यायची आहे. देश-राज्य याची चिंता करा पण काम खाली बूथ पातळीवर करायचं आहे. निवडणुका होई पर्यंत खाली बघा असा संदेश नड्डा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला. भाजपाच्या विशेष कार्यसमितीत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.
आम्ही काँग्रेसमुक्त भारत बनवणार सांगीतलं होतं. पण याच बरोबर भाजपायुक्त भारत ही बनवणार ही आहोत. काँग्रेसयुक्त म्हणजे भ्रष्टाचार, तो आम्हाला दूर करायचाय. भाजपाने लोकांची सेवा केलीय तर काँग्रेसने फक्त मेवा खाल्लाय. हे आपल्याला बदलायचं आहे असं जे पी नड्डा (JP Nadda ) यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलं.

अच्छे दिन आ चुके हैं…

2014 च्या आधी आपण जगभरात कुठे जात होतो तर आपली काय प्रतिमा होती. परराष्ट्र धोरण नसलेला, भ्रष्टाचारी देश अशी आपली प्रतिमा होती. पण आज आपल्याला परदेशात राहताना-जाताना गर्व वाटतो. परदेशातल्या भारतीयांना मानाचं स्थान मिळू लागलंय. जे भारतीय भारताचं राजकारण प्रभावित करत होते ते आता अमेरिकेतलं राजकारण ही प्रभावित करायचं सामर्थ्य ठेवतात. म्हणूनच ट्रम्प ही सबका साथ सबका विकास चा नारा देत आहेत. मोदींना अनेक देश आपल्या देशातील सर्वोच्च सन्मान देत आहेत. यावरून लक्षात येतं की देश बदललेला आहे. यावरूनच देश बदललाय आणि अच्छे दिन आलेयत हे सिद्ध होतं असं नड्डा यांनी सांगीतलं
इंदिरा गांधी यांनी बँकांचं राष्ट्रीयीकरण करून बँका गरीबांसाठी खुल्या केल्या. पण तेव्हापासून आता पर्यंत पावणेतीन कोटी अकाऊंट होते. जनधन सुरू झाले तेव्हा अनेकांनी टीका केली. पावणेतीन ते 36 कोटी अकाऊंट सुरू झाले. हे केवळ अकाऊंट ओपनिंग नाही तर आर्थिक सहभाग आहे. उज्वला गॅस, घराघरात वीज, अकाऊंट मध्ये थेट पैसे येणं, स्वच्छ भारत योजना या योजनांमुळे लोकांचं जीवन अमुलाग्र बदललंय. प्रगती झालीय, हे आता लोकांना सांगावं लागणार आहे. कार्यकर्त्यांनी हे काम केलं पाहिजे असा संदेश नड्डा यांनी दिलाय.
सध्या भाजपाची 11 कोटी सदस्य संख्या आहे, मात्र अजून 10 कोटी सदस्य जोडायचे आहेत. भारतातील कुठलाच समाज घटक सुटता कामा नये. दलित-वंचित, शोषित कुणीच सुटता कामा नये. सदस्य नोंदणी अभियानावर मी स्वतः लक्ष देत आहे, असं सांगत नड्डा यांनी कार्यकर्त्यांना पक्षपातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.