अखेर जीव भांड्यात पडला…

अखेर जीव भांड्यात पडला…

515
0

आज २० जूलै२०१९ रोजी शहापुर मधील कामे आटोपून दुपारी अडीच तीनच्या सुमारास जेवण करण्यासाठी बाजारहाट करून घरी निघालो .गाव हाकेच्या दोन अडीच किलोमिटर अंतरावर असल्याने दिवसभरात दोन चार चकरा ठरलेल्या. मोटार सायकलला दोन पिशव्या अटकवून पंडीत नाक्याहून लिबर्टीच्या दिशेने निघालो.  गोठेघर गावदेवी मंदीराजवळ डाव्या बाजूने एक आजोबा पायी चालल्याचे दिसले.मध्यमबांधा धोतर, पैरण,टोपी असा पांढराशुभ्र पेहराव पाठी मागे मोठी छत्री अटकवलेली हातात काठीचा आधार .चालता चालता त्यांचा तोल जात होता.

रस्त्यात वाहनांची आणि खड्यांची रांगच रांग… एकंदरीत आजोबांच्या बाबतीत काहीतरी गडबड आहे असा अंदाज बांधून गाडी बाजुला लावली दोन चार पावलं टाकून आजोबांच्या जवळ गेलो आणि त्यांना विचारले आजोबा कुठे जायचे आहे .दोन वेळा विचारूनही आजोबा काही बोलले नाही. काही वेळाने आजोबा बोलते झाले बा लेका मला ऐकाला कमी येतंय बऱ्याच लांबून पायी आलोय चालता येत नाही अंग कापतय काठीच्या आधारावर इथवर आलोय… आजोबा चांगल्या घरचे वाटत होते पण थकलेले आणि तहानलेले… आजोबांना हाताचा आधार देवून पुन्हा विचारले तुम्हाला कुठे जायाचे आहे त्यांनी तात्काळ उत्तर दिलं लेकीकडे चेरपोलीला… मुलगी माझी बिल्डींग मध्ये राहते कोणती बिल्डींग ठीकाण नगर काही माहीत नाही या अगोदर बऱ्याच वेळा आलो आहे लेकी कडे पण मीआता विसरलो आहे. आता मी कुठे आहे काहीच कळत नाही.आता नेहमीच विसराला होतं.. चेरपोली आता काय छोटी राहीली आहे कुठं शोधायची लेकीला या विवंचनेत सापडलो.. मग मी त्यांना सांगीतले तुम्ही ज्या रस्त्याने चालले आहात तो रस्ता लिबर्टी कंपनी कडे जातो चेरपोली विरूध्द दिशेला मागे राहीली.

आजोबांना हाताला धरून गावदेवीच्या मंदीरा समोरील लादीच्या दुकानात खुर्चीत बसवून ग्लास भरून पाणी दिले तहानलेले आजोबा गटगटा पाणी प्यायले त्यांना हायसे वाटले. पण अंग थरथरत होतं. आजोबांना कमी ऐकाला येते याची जाण झाल्याने मी जोरात विचारले आजोबा तुमच्या गावाचे आणि तुमचे नांव काय ? आमचं नाव रामा दत्ता हरड गाव ठुणे… मी क्षणाचाही विलंब न करता ठुणे गावचे मित्र गोपाळ वेखंडे सरांना फोन लावला सरांना सर्व हकीगत सांगीतली सरांनी लगेच उत्तर दिले अशा नावाची व्यक्ती आमच्या गावात कोणीही राहत नाही परंतू गावपाड्यात कोणी असेल तर चौकशी अंती सांगतो .दरम्यान आजोबांना विचारले तुमच्याकडे कोणाचा फोन,आधारकार्ड आहे का आजोबांनी त्वरित वरील खिशातील आधारकार्ड माझ्याकडे दिले नाव सांगितल्याप्रमाणे बरोबर होते वय-८५ गाव ठुणे पाडाले मुरबाड…काम वाढल्याचे लक्षात घेऊन मुरबाड मधील पत्रकार मित्र हीत संबंधीतांना आजोबांची माहीती दिली परंतू हाताला काहीच लागले नाही… मग ठरवलं आजोबांना घेऊन सगळी चेरपोली पालथी घालायची आजोबांना गाडीवर बसवलं निट धरा जपुन बसा मला पकडून बसा खड्डे आहेत असे सांगितले.बा लेका मी बरोबर बसेन तू चल ..आजोबा कुठे जायचे ते सांगा.

चेरपोली…..शिवशक्ती..पंडीतनाका..असा प्रवास करून बरोरा हाऊस येथे आलो येथे नाही राहत माझी पुष्पा … लेकीचं नाव षुष्पा आहे हे समजले मग पुर्ण नाव विचारले आजोबा बोलले पुष्पा पवार माझे जावई आमच्याकडचे मुरबाडचे आहेत. आजोबाच बोलले एक मंदीर आहे देवीचे समोर हत्ती आहेत त्याच रस्त्याने सरळ पुढे जायाचे मी तडक देवीच्या चौकात येऊन आजोबांना हत्ती सहीत मंदीर दाखविले आता मात्रआजोबा फार खुष झाले लेका बरोबर आलो मलाही बरं वाटलं लवकर घरी जावे कारण पावसाने जोरदार जमवाजमव सूरू केली होती. आत्ता चल पुढं आजोबांनी फर्मान सोडलं मंदीर.. बँक..शिरोडकर दवाखाना.. थेराणी.. पाण्याची टाकी करून परळवाले डोळ्यांच्या दवाखान्या कडे सांगीतले तिकडेच माझी पुष्पा राहते.

आम्ही हळूहळू पुढे चल करत करत उतार उतरून पुन्हा बरोरा हाऊस जवळ येऊन थांबलो ओळखीचे मित्र भेटत होते आज जोडीला आजोबा… आम्हाला पण फिरवत जा जोडीला मी कोणत्या गर्तेत आहे त्यांना काय सांगू. आजोबा आता काय करायचं कुठे भेटेल तुमची लेक ,बा एक काम कर पुलाच्या पुढं ग्रामपंचायत आँफीस आहे तेथे चल ,आजोबांच्या लक्षात पक्क आले होते मुलीचे राहण्याचे ठीकाण पण तेथेही पदरी निराशाच पडली त्या नावाची महीला येथील घर सोडून कल्याण राहायला गेल्याचे समजले तरीही आजोबा हार मानायला तयार नाही लेका पुढं चल बोगद्यातून एक मंदीर लागल… मारुतीचे का ? आजोबा हो बोलले .. आजोबाच्या बाबतीत माझ्याकडे दोनच पर्याय शिल्लक राहीले होते एक माझ्या घरी दोन दिवसांचा पाहुंणचार देणे आणि दुसरा आल्या पावली ठुणे ता. मुरबाडला सोडणे. शेवटचा पर्याय म्हणून महाराजा मार्गे बोगद्यातून चेरपोलीचे मंदिर गाठले गावातील तरुणांना लेकी बाबत विचारले पण काहीही फायदा झाला नाही. गाडीला सेल दीला आजोबाला घरी घेऊन जाण्यासाठी कसं सोडून जाणार त्यांना…. बाबा आणि आजोबा जाऊन चाळीस वर्षे झालेत.. तासंभर का होईना माझ्या आजोबांना घेऊन फिरलो असं मनोमन वाटलं.

तेवढ्यात आजोबा बोलले बोगद्याला लागून एक दुधवाला राहतो उभे होतो तेथूनच शेणखाई दिसली तेथूनच डाव्या हाताला गाडी आत घेतली घरासमोर गाडी थांबवली. आजोबांना पाहून दोन मुलं एक व्यक्ती माडी वरून उतरून खाली आले ते आजोबांना ओळखत असल्याचे समजले चौकशी अंती त्यांना सगळी हकीगत सांगीतली. आजोबांचे नातेवाईक भेटल्याने अखेर जीव भांड्यात पडला. आज एका व्रुध्द आजोबांना मदत केल्याने मनस्वी आनंद झाला. आजोबांना ती दोन मुलं माडीवर घेऊन गेले माझी सर्व माहीती सांगून त्या व्यक्तीला विचारले आजोबाची लेक ह्याच घरात राहते का ? ते म्हणाले नाही मग कुठे राहते आता कल्याण राहते अगोदर ग्रामपंचायत समोर राहत होती आम्ही नातेवाईक आहोत त्यांचे त्यांना घेऊन जावू त्यांच्या गावी… ज्या प्रिय लेकीला भेटण्यासाठी जीवाचा आटापिटा करून एवढ्या प्रसंगाला सामोरे जावून आजोबाला शेवट पर्यंत लेक भेटली नाही… हे बापच करू शकतो… शेवटी बाप तो बापच ! सात मिनिटात घरी पोहचलो आठवडाभर थांबलेल्या पावसाने वारा विजांच्या कडकडाटासह धूवाधार सुरुवात केली… आजोबा पाऊस घेऊन आल्याचे समाधान वाटले…..

बबन काळुराम गायकवाड (पत्रकार)
मु.कवडास,ता.शहापुर,ठाणे