Home मॅक्स रिपोर्ट वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर, संतप्त कर्मचारी रस्त्यावर

वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर, संतप्त कर्मचारी रस्त्यावर

229
0
Support MaxMaharashtra

मुंबईत गोरगरीबांना आरोग्याच्या सुविधा घेणं परवडत नाही. अशातच गोरगरीबांना स्वस्तात रुग्णसेवा देणारे वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. शासनाकडून या रुग्णालयाचे २३० कोटींचे अनुदान थकित आहे.

रुग्णालय बंद होणार असल्यानं रोजीरोटीचा प्रश्न असणाऱ्या वाडिया रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर देखील सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे सत्तेत सहभागी असणारे कॉंग्रेस नेते सचिन सावंत देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

वाडिया रुग्णालय बंद होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आहे. दरम्यान,  महाराष्ट्रात सत्तेत सहभागी असणाऱ्या  काँग्रेसचे नेते सचिन सावंत देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या संदर्भात त्यांनी ट्विट देखील केलं आहे.

तर दुसरीकडे माजी मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील हे रुग्णालय बंद पडू देणार नाही. यासाठी आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा त्यांनी ट्विटर द्वारे दिला आहे.

‘वाडिया रुग्णालय आणि महापालिका यामध्ये सुरू असलेली तू तू मै मै यामागे वेगळाच “डाव”? रुग्णालय बंद करुन कोट्यवधीची मोक्याची जागा हडप करण्याचे वाडिया आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे हे षडयंत्र? तातडीने रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरु करा! आम्ही तुमचा हा डाव हाणून पाडू! रस्त्यावर उतरू!!’

दरम्य़ान वाडिया रुग्णालय ९० वर्षांपेक्षा जास्त जुनं असून य़ा रुग्णालात गोरगरीब लोक उपचार घेतात. मात्र, शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडे या रुग्णालयाचे २३० कोटी रुपये थकीत आहेत. आज या  रुग्णालयाकडे निधी नसल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. वाडिया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. औषधसाठा संपत आला असून नविन औषध खरेदीसाठी देखील निधी नसल्याचं येथील कर्मचाऱ्यांच म्हणणं आहे.

या संदर्भात आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी बातचित केली असता, त्यांनी

‘वाडीया रुग्णालयाची थर्ड इस्टॉलमेन्टची रक्कम जी आर्थिक वर्षात तीन टप्प्यात दिली जाते. तिचा तिसरा टप्पा आम्ही लगेचच देणार आहोत. मात्र, जी थकीत रक्कम सांगितली जात आहे. तो बॅक लॉक आहे. हा 2015 पासून बाकी आहे. या संदर्भात आज बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. वाडीया रुग्णालय बंद होणार नाही. सध्या वाडीया बंद होण्याच्या अफवा परवल्या जात आहेत.’

असं त्यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं. दरम्यान सध्या राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार आहे. तर मुंबई महानगरपालिकेत देखील शिवसेनेचीच सत्ता आहे. त्यामुळे आता गोरगरीबांच सरकार म्हणून सत्तेत आलेल्या ‘महाविकास आघाडी’च्या सरकारने गोरगरीब लोकांना आरोग्य सुविधा देणाऱ्या या रुग्णालयाची थकीत रक्कम लवकरात लवकर अदा करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांसह रुग्णांनी केली आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997