Home News Update शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा होईल का?

शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा होईल का?

Support MaxMaharashtra

महाविकास आघाडीच्या नव्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी ती वास्तवात कशी येणार याबाबत अनेक शंका आहेत. शेतकऱ्यांना सरकारकडून आपेक्षा असल्या तरी आधीच कर्जात बुडालेला महाराष्ट्र हजारो कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकेल का याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी मुक्त पत्रकार पार्थ एम. एन. यांनी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला होता. तेव्हा त्यांनी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावर त्यांनी विस्तृत मालिका प्रसिद्ध केली होती.

हे ही वाचा…

मुख्यमंत्री कार्यालयाची वेबसाईट, फेसबूक पेज गायब!
पंकजा मुंडे यांचं ठरलं? राजकीय भूकंपाची शक्यता
विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

‘मॅक्स महाराष्ट्र’च्या स्टुडिओमध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. या मुलाखतीत भाजप सरकारकडून केल्या गेलेल्या कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला? राज्यातील बँका शेतकऱ्यांना कर्ज का देत नाहीत? कर्जमाफीची प्रक्रिया कशी आहे? कर्जमाफी झाली तर शेतकरी आत्महत्या थांबतील का? अशाप्रकारच्या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997