Home > मॅक्स वूमन > स्पेन डायरी > स्पेन डायरी - भाग १२

स्पेन डायरी - भाग १२

स्पेन डायरी - भाग १२
X

आज माझ्या अनेक वर्षे योजीलेल्या माद्रिदला निघायचे होते आणि तेसुढ्हा सन खावीयरवरुन. त्यामुळे मी चक्क पहाटे सहाला उठले आणि शूज घालून लगोलाग समुद्राच्या दिशेनं निघाले. याची दोन मुख्य कारण अशी की, मर्से आम्हाला सोयीस्कर म्हणून व्यालेंशीयाला सोडणार होती. तिथून ट्रेन घेवून आम्ही माद्रीदला जाणार असे योजिले होते. व्यालेंशीयाला राहावे की नको यावर आमचं एकमत होत न्हवतं. त्यासाठी आदल्या रात्री ग्रीनरूममध्ये आम्ही डीकबरोबर ऑनलाईन बुकींग करून एक छानसं हॉटेल बुक केले होते. माझा मामेभाऊ सौमित्र मागे ग्रीसला होम स्टे घेवुन राहिला होता. त्याने वर्णन केलेल्या अनुभवानंतर माद्रिदला आपण होम स्टे घ्यावा या मतावर मी ठाम होते. पण ऐअर बीनबी वर आम्हास हे डील खुप झकास मिळाले म्हणून आम्ही माद्रिद हॉटेलच नक्की केले. आयत्या वेळी ठरलेल्या आमच्या बूकिंग व इतरही गोष्टीत डीकची मदत मोलाची ठरली.तर नमनाला खंडीभर तेल न ओतता मुद्द्यावर येते की, वेळ खूपच कमी होता. म्हणुन थोडा वेळ तरी रत्नाकराचे दर्शन व्हावे या अपेक्षेने पळत सुटले.

रस्ते निर्मनुष्य होते. एखादा दूसरा माणूस चालत होता. पण जे अप्रतिम असे हॉटेल आम्हांला दिले होते त्याच्या आजुबाजुला "हॅपेनिँग" असे वातवरण म्हणजे जागोजागी फूड स्टॉल्स, झालंच तर दुकाने, बीअर बार, कसीनोस, सुंदर भेट्वस्तुंची दुकाने सारंच आपल्याकडं खेचणारे! सगळीकडे चक्क कानाडोळा करून मी सपासप पाऊल उचलत किनाऱ्यावर पोहोचले आणि माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. दूरदूर वर पसरलेला अथांग सागर, किनाऱ्यावर असलेली मोतीया रंगाची वाळू, झुंजुमुंजु होऊ लागलेले आकाश, दूरवर शिड उभारलेल्या होड्या, एकटाच गळ घेवून मासे पकडणारा माणूस, आणि या पार्श्वभूमीवर सुरु असलेली समुद्राची विलंबित लयीतील गाज...आनंदाची व्याख्या आणि काय असू शकते?

मी उगवणाऱ्या तेजोनिधीला काही क्षण नमन केले. त्या सुखांतात काही काळ देहभान हरपले. काळजात प्रत्येक घडी गोठवून ठेवली. मागे आवाज आला म्हणुन पाहिले तर शिस्तबध्द कवायत करत काही मुले पळत होती. मी माझे काही सेल्फी काढले तसेच एका रपेट करत असलेल्या बाईला विनंती करत माझे काही फोटो काढून घेतले. माग फिरले तर परतीच्या वाटेवर एक गोंडस कुतू भेटला. त्याचे मनसोक्त लाड केले आणि मनावर दगड ठेवत रूमकडे निधाले. सगळे न्याहारीसाठी एकत्र जमलो. तेव्हा वर्तमानपत्रात आलेली बातमी दाखवत डीक हर्टमन आला.

मुनीकवर दहशतवादी हल्ला होता. आमचे धाबे दणाणले. कारण परत आम्ही तिथूनच जाणार होतो. न्याहारीची सगळी चवच निघुन गेली. कसेबसे दोन घास पोटात टाकून आम्ही पुढील प्रवासाला सज्ज झालो. व्यलेंशीया पाच तासात व पुढं माद्रिद अड्मासे सहा तासावर म्हणजे गेला बाजार एकूण दहा तासांचा प्रवास अपरिहार्य होता. शिवाय वेटिन्ग पीरियड अलाहिदा. कतालानच्या रहाटीप्रमाणे पुन्हा एकदा रमत गमत गाडीने गोगलगायीगत आम्ही यथावकाश व्यालेंशीया या स्वच्छ रेल स्थानकावर एकदाचे पोहोचलो.

क्रमश;

Dr Manisha Kulkarni

Updated : 10 Jun 2017 7:23 AM GMT
Next Story
Share it
Top