प्रबोधनाची चाक उलट्या दिशेने फिरत आहेत – स्मिता पानसरे

प्रबोधनाची चाक उलट्या दिशेने फिरत आहेत – स्मिता पानसरे

85
0
देशात विवेकवादी विचारसरणीवर गेल्या काही वर्षात हल्ले वाढले आहेत. अशा परिस्थिती विवेकवादी विचारसरणी मागे पडत आहे का? देशात लोकशाही वातावरणावर आघात होत आहे का? मॉब लिंचिंगचं प्रमाण का वाढतं आहे. या संदर्भात कॉ. गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांच्याशी मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी खालिद शेख यांनी बातचित केली. यावेळी त्यांनी विवेकवादी विचाधारा देशातच नाही जगभरात वाढत असल्याचं सांगत उजव्या विचारसरणीचं देशातील लोकशाही मार्गानं निवडूण आलेलं सरकार लोकशाहीचाच विरोध करत असल्याचं म्हटलं आहे.
‘प्रस्थापित सरकार जे सत्तेवरती आज सत्तेवर आले आहे. त्यांच कामकाज पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की, महाराष्ट्रातील प्रबोधनाची चाक उलट्या दिशेने फिरवण्यासाठी, माणसांना पुन्हा उलट्या दिशेनं नेण्याचं काम खरं तर जाणीव पुर्वक सत्तेचा वापर करुन करताना दिसतायेत. बऱ्याचदा हे सर्व पाहिल्यानंतर धर्मांध उजव्या शक्ती माणसांना 16 व्या शतकात घेऊन जात असल्याचं दिसून येत आहेत.’
ज्यांनी खर तर या देशाला पुढं घेऊन जायचं आहे. विज्ञानाचं शिक्षण घेतलं आहे. एखाद्या राज्याची प्रमुख आहेत. अशी माणसं बेताल वक्तव्य करत आहेत. आणि ही वक्तव्य़ जे मीडियातून आजच्या पिढीसमोर येतं तेव्हा मात्र, या वक्तव्याचं कारण काय आहे. ते लक्षात येतंय. आता माणसं विज्ञानाचा वापर करायला शिकली आहेत. शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे. लोक आता चिकित्सा करायला लागले आहेत.
देशात सध्या मॉब लिंचिंगच्या घटना वाढल्या आहेत यावर बोलताना स्मिता यांनी चिंता व्यक्त करत मारली जाणारी माणसं दलित आणि अल्प संख्याक असल्याचं सांगितलं. एक कार्यकर्ती म्हणून मला आता असं वाटतंय ही झुंड शाही जाणीव पुर्वक केली जात आहे का? झुंडशाही पुरस्कृत झाली आहे का? अल्पसंख्यांकावरती दहशत निर्माण करण्यासाठी बहुसंख्याक दहशत निर्माण करत आहेत का? बहुसंख्यांकाच्या मदतीने अल्पसंख्याकावरती कटकारस्थान रचलं जात असल्याचं मला वाटतं.
सध्याच्या सरकारबद्दल बोलताना स्मिता यांनी हे सरकार ज्या लोकशाही मार्गाने सत्तेवर आलं त्याच लोकशाहीच्या विरोधात हे सरकार काम करत असल्याचं सांगत आपल्याला लोकशाही वाचायची असेल तर सर्वांना नेटाणं काम करणं गरजेचं असल्याचं स्मिता पानसरे यांनी पुढे बोलताना सांगितलं.