Home News Update संभाजी भिडेंचा सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न- संभाजी ब्रिगेड

संभाजी भिडेंचा सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न- संभाजी ब्रिगेड

Support MaxMaharashtra

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)  यांचे वंशज उदयनराजे यांचा अपमान करणाऱ्या संजय राऊतांवर (Sanjay Raut) कारवाईच्या मागणीसाठी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या शिवप्रतिष्ठाननं सांगली बंदची घोषणा केलीये. पण सांगलीमध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. संभाजी भिडे यांचा पुन्हा एकदा सामाजिक शांतता बिघडवण्यचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज सांगली दौऱ्यावर येणार असल्यानं त्यांच्या दौऱ्यात बाधा आणण्यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचा आरोपही शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र कोळी यांना केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी महाराजांशी तुलना झाली तेव्हा संभाजी बिडे गप्प का राहिले असा सवालही शिवसेनेनं विचारलाय. दरम्यान उदयनराजेंचा अपमान करणाऱ्यांचा समाचार संभाजी ब्रिगेड घेईल, पण त्यांच्या नावानं कुणी सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर संभाजी ब्रिगेड ते सहन करणार नाही, असा इशाराही संभाजी बिडे यांना देण्यात आला आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997