Home News Update अरविंद सावंत यांचा राजीनामा, शिवसेना NDA मधून बाहेर

अरविंद सावंत यांचा राजीनामा, शिवसेना NDA मधून बाहेर

courtesy - social media
Support MaxMaharashtra

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या(shivsena) गोटातून हालचालींना वेग आला आहे. भाजपशी (BJP)  फारकत घेतल्यानंतर आज शिवसेना सत्तेचा दावा करणार आहे. त्यासाठी शिसवसेने एनडीएतून (NDF) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत (arvind sawant) हे आज राजीनामा देणार आहेत. सावंत यांनी स्वतः ट्विट करून याबद्दल माहिती दिली.

लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे.

हे ही वाचा..

शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे या आशयचं ट्विट सावंत यांनी केलंय. यासोबतच ११ च्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचंही सांगितलंय.

आमचा पाठिंबा हवा असेल तर शिवसेनेनं एनडीएतून बाहेर पडावं आणि केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी अट राष्ट्रवादीकडून घालण्यात आली होती. त्यानंतर आता सेनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997