Home News Update बाटग्यांची उठाठेव! फक्त विरोधासाठी विरोध- सामना दैनिक

बाटग्यांची उठाठेव! फक्त विरोधासाठी विरोध- सामना दैनिक

Courtesy : Social Media
Support MaxMaharashtra

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी (Indira Gandhi) कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यास भेटायच्या असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे शिवसेना आणि कॉंग्रेसमध्येच जुंपते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र कॉंग्रेस नेत्यांनी संजय राऊत यांना इंदिरा गांधीविषयी आपल्या वक्ताव्यांना आवर घालण्याची ताकीद दिली. यावर संजय राऊत यांनी माफी मागत आपलं वक्तव्य मागेही घेतलं.

भाजपने (BJP) मात्र या संधीचं सोनं करत राऊत यांच्यावर निशाणा साधला. सोबतच माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागण्याचा वादही चांगलाच पेटला आहे. याविरोधात पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राऊत यांच्याविरोधात आज बंदही पुकारण्यात आला आहे.

या वादांवर संजय राऊत यांनी आज सामना दैनिकाच्या अग्रलेखातुन भाजपवर जोरदार टीका करताना हा वाद म्हणजे ‘बाटग्यांची उठाठेव’ असल्याचे सांगत हा ‘फक्त विरोधासाठी विरोध’ असल्याचं म्हटलं आहे. “भाजपाला इंदिरा गांधी प्रिय झाल्याचा सर्वात जास्त आनंद आहे. इंदिराजींच्या स्मृती कायमच्या मिटाव्यात असे ज्यांना वाटते त्यांनाच इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाची काळजी वाटावी हे आश्चर्यच आहे,” अशा शब्दांत ‘सामना’च्या अग्रलेखामधून राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

सोबतच उदयनराजे याच्या ‘मोदी पेढेवाले’ किस्स्याची आठवण करुन देत “पंतप्रधान मोदी (Narendra Modi) या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास ‘पेढेवाले’ वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजूने संपूर्ण भाजप उभा ठाकला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो,” असं म्हणत भाजपलाही धारेवर धरले आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997