Home News Update अतिउत्साही नेत्यांना आवरा, शिवेंद्रराजे संतापले

अतिउत्साही नेत्यांना आवरा, शिवेंद्रराजे संतापले

Support MaxMaharashtra

भाजपच्या केंद्रीय कार्यालयात आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेल्या आज के शिवाजी-नरेन्द्र मोदीहे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आमदार शिवेंद्रराजे यांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घाला अशी ताकीदच भाजपला दिली आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी कुणाचीही तुलना कधीच होऊ शकत नाही. पण पक्षात काही अतिउत्साही कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे पक्ष नेतृत्त्वावर चिखलफेक केली जाते. त्यामुळे अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालण्याची गरज आहे’

असं म्हणत आमदार शिवेंद्रराजे यांनी या पुस्तकावर अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

चांगल्या पत्रकारितेसाठी तुमचं योगदान आवश्यक आहे.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा


Warning: A non-numeric value encountered in /home/maxmaharashtra/public_html/wp-content/themes/Newsmag2/includes/wp_booster/td_block.php on line 997